Asha Bhosle 3 Nicknames: आशा भोसलेंची 3 टोपणनावं चर्चेत; मास्टर दीनानाथ लाडाने 'ही' हाक मारायचे
मंगेशकर कुटुंबाने मिळून भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीताला एक वेगळी ओळख दिली. आशा भोसले यांच्या अतुलनीय प्रतिभेमुळे आणि योगदानामुळे अनेक दशकं भारतीय संगीत समृद्ध झालाय.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी ( 12 एप्रिल) रोजी निधन झालं. सोमवारी सूरसम्राज्ञीला शेवटचा निरोप देण्यात आला.
1/7
आशाजींच्या जाण्यानं साऱ्या कला विश्वावर शोककळा पसरली आहे. आशाजींच्या अनेक जुन्या मुलाखती समोर येत आहेत. यात लहानपणीच्या त्यांच्या 3 टोपणनावां विषयी त्यांनी सांगितलं.
2/7
अशाच एका मुलाखतीतील त्यांच्या आणि मास्टर दीनानाथांच्या लडीवाळ लहानपणीच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिलाय.
3/7
मास्टर दीनानाथांना चार मुली. पहिल्या लता, मग मीना, आशा आणि हृदयनाथांनंतर धाकटी उषा.
4/7
सगळ्यांची लाडकी असल्याने दीनानाथांचं त्यांच्यावर विशेष प्रेम. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं ' माझ्या वडिलांची घरात सक्त ताकीद असे, माझ्या हब्याला कुणी काही बोलायचं नाही '
5/7
त्या पुढे म्हणाल्या ' हबं, पैलवान आणि पठाण ही माझी 3 नावं. पठाण पहिलं मग पैलवान आणि मग हबं '
6/7
' सगळ्या कामांना मी पुढे व्हायचे , 'हबं ' चा अर्थ मूर्ख. ' त्यांनी हसत सांगितलं.
7/7
' घरात दीदी, मीनाताई, उषा काय करायच्या, घरात काही फुटलं तर त्या म्हणायच्या आशाने फोडलं. त्यावर बाबा म्हणायचे जाऊदे, तिला कोणी काही बोलायचं नाही असं होतं '
Published at : 14 Apr 2026 01:25 PM (IST)