Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: गुपचूप साखरपुडा! अर्जुन रामपालनं गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लग्नाआधीच नात्याला दिली नवी ओळख

Arjun Rampal : अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दोघेही अलीकडेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट शोमध्ये एकत्र दिसले होते. याच पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितलं.

Continues below advertisement

अर्जुन रामपाल गॅब्रिएला डेमेट्रियाडिस सोबत साखरपुडा झाल्याची पुष्टी केली

Continues below advertisement
1/6
अभिनेता अर्जुन रामपालनं त्याची दीर्घकाळची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत गुपचूप साखरपुडा केल्याचं जाहीर करत चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला आहे.
2/6
याच शोमध्ये अर्जुन रामपालनं पहिल्यांदाच त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत कबुली दिली. रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट शोमध्ये या जोडीनं त्यांच्या नात्याबद्दल अनेक खास गोष्टी उघड केल्या.
3/6
अर्जुन आणि गॅब्रिएला हे दोघे 2019 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांना अरिक आणि अरिव अशी दोन गोंडस मुलं आहेत. दोघांचं अजूनही लग्न झालेलं नसतानाही ते कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, हे गॅब्रिएलानं पॉडकास्टमध्ये स्पष्ट के
4/6
अर्जुन रामपालचं यापूर्वी मॉडेल मेहर जेसियाशी लग्न झालेलं होतं आणि त्याना त्या लग्नापासून दोन मुली आहेत. मायरा आणि महिका अशा दोन मुलीची नाव आहेत
5/6
साखरपुड्याच्या बातमीमुळे अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
6/6
सध्या अर्जुन रामपाल आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे. क्रूर पाकिस्तानी मेजर इक्बालची भूमिका त्यांनी निभावली आहे
Sponsored Links by Taboola