Arjun Kapoor: अर्जुनने फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधले अनेकांचे लक्ष..
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जुन सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो.
वेगवेगळ्या पोस्ट अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो.
अर्जुनने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोला अर्जुनने दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
अर्जुननं त्याचा ब्लॅक अॅड व्हाइट फिल्टर असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये अर्जुन आकाशाकडे पाहताना दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'मला नेहमी वाटतं की माझी आई मला वरून पाहातेय. #mymommybestest ' अर्जुनला या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
अर्जुनचे वडील बोनी कपूर आणि त्याची आई मोना कपूर यांचा 1983मध्ये विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर 1996मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2012 मध्ये मोना कपूर यांचे निधन झाले. अर्जुन आणि त्याची बहिण अंशूला हे मोना कपूर यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. (all photo:arjunkapoor/ig)