Arijit Singh : संगीतविश्व गाजवणाऱ्या अरिजित सिंहबद्दल जाणून घ्या...
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंहचा आज वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरिजित आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अरिजितने 'मर्डर 2' या सिनेमातील 'फिर मोहब्बत' या गाण्याच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
अरिजित सिंह 'आशिकी 2' या सिनेमातील 'तुम ही हो' या गाण्यामुळे रातोरात स्टार झाला.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या गायकांच्या यादीत अरिजित सिंहची गणना होते.
अरिजित सिंहच्या 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे','पल','सोच ना सके', इलाही', हमारी अधुरी कहानी' या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
अरिजित सिंहला संगीताचा वारसा घरातूनच मिळाला आहे.
अरिजित सिंहचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला.
अरिजित सिंहची अनेक गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अरिजित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.