या अभिनेत्रीने टॅलेंट आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली होती, आता झालीये परदेशी स्थायिक!
अभिनेत्री अर्चना जोगळेकर, जी केवळ हिंदीच नाही तर मराठी आणि उडिया चित्रपटसृष्टीतही मोठे नाव आहे. अर्चना जोगळेकर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या अप्रतिम नृत्य कौशल्यासाठीही ओळखली जाते.(photo:archanajoglekarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्चना ही एक उत्तम प्रशिक्षित आणि व्यावसायिक शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिने तिची आई आशा जोगळेकर यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले ज्या स्वतः एक व्यावसायिक कथ्थक नृत्यांगना आहेत आणि मुंबईत स्वतःची नृत्य शाळा देखील चालवतात.(photo:archanajoglekarofficial/ig)
किस्सा शांती का, फूलवती आणि कर्मवीर यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिकांमुळे या अभिनेत्रीला घराघरात ओळख मिळाली.(photo:archanajoglekarofficial/ig)
अर्चना जोगळेकरने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न केले होते.(photo:archanajoglekarofficial/ig)
1999 मध्ये लग्नानंतर अर्चना अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात शिफ्ट झाली.(photo:archanajoglekarofficial/ig)
बातमीनुसार, अर्चना येथे स्वतःची डान्स स्कूल चालवते आणि मुलांना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देते.(photo:archanajoglekarofficial/ig)