Anushka Sharma : पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला बोल्ड लूक, पाहा खास फोटो!
बॉलीवूडमधील सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक असलेली अनुष्का शर्माला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो :anushkasharma/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही काळापासून ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबाची काळजी घेण्यात खूप व्यस्त झाली आहे. एका मुलीची आई आणि वयाच्या 34 व्या वर्षीही अनुष्काने स्वत:ला कमालीचे सांभाळले आहे. (फोटो :anushkasharma/ig)
सध्या अनुष्का पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत सुट्टीसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. जिथून अभिनेत्रीने आता काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांना नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :anushkasharma/ig)
यामध्ये तीने केशरी रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. विशेष म्हणजे अनुष्काने हे दोन फोटो स्वतः क्लिक केले आहेत.(फोटो :anushkasharma/ig)
या लूकसोबत अनुष्का स्कार्फ आणि गोल टोपी घातलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'स्वतःचा फोटो काढण्याचा परिणाम...'.(फोटो :anushkasharma/ig)
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी 'चकडा एक्स्प्रेस' या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. (फोटो :anushkasharma/ig)