अभिनय क्षेत्राबरोबरच अनुष्काची निर्मीती क्षेत्रात एन्ट्री; या कंपन्यांसोबत केलं डील
Anushka Sharma Production House : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अभिनय क्षेत्राबरोबरच निर्मीती क्षेत्रातही काम करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्काचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. तिच्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव क्लीन स्लेट फिल्म्स प्राइव्हेट असं आहे.
नुकतीच अनुष्काच्या या प्रोडक्शन हाऊस कंपनीनं मोठं डील साइन केले. हे डील क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शन हाऊसनं नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन (Amazon) या कंपन्यांसोबत केली.
रिपोर्टनुसार अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसनं नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनसोबत जवळपास 400 कोटी म्हणजेच 54 मिलियन डॉलरचं डील केली आहे.
ट फिल्म्स प्रोडक्शन हाऊस हे येत्या 18 महिन्यात त्यांचे आठ चित्रपट आणि वेब सीरिज हे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफोर्मवर स्ट्रीम करणार आहेत. याबाबत नेटफ्लिक्सनं या प्रोडक्शन हाऊससोबतच्या तीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. पण अॅमेझॉननं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. (all photo:anushkasharma/ig)