Anushka Sharma, Chakda ‘Xpress : अनुष्काचं धमाकेदार पुनरागम; ‘चकदा एक्स्प्रेसच्या शूटिंगला करणार सुरुवात!

(photo:anushkasharma/ig)

1/6
Anushka Sharma, Chakda ‘Xpress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते.(photo:anushkasharma/ig)
2/6
2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर 11 जानेवारी 2021मध्ये रोजी तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता अमुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आहे.(photo:anushkasharma/ig)
3/6
‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda ‘Xpress) या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.(photo:anushkasharma/ig)
4/6
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक ‘Chakda Xpress’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शर्माने या चित्रपटाची तयारी सुरू केली असून, ट्रेनिंगचा व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा क्रिकेट पीचवर घाम गाळताना दिसली होती. मात्र, आता तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. (photo:anushkasharma/ig)
5/6
आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.(photo:anushkasharma/ig)
6/6
अनुष्का शर्मा शेवट शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कतरिना कैफही मुख्य भूमिकेत होती. ‘झिरो’नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करत होती. तिने ‘पाताल लोक’ या वेब सिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांनाच अनुष्काच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.(photo:anushkasharma/ig)
Sponsored Links by Taboola