Anushka on Kohli Retirement : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का म्हणाली..

virat

1/6
Anushka on Kohli Retirement : विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवशीय कर्णधारपदानंतर भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे.
2/6
विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी विराटबद्दलच्या त्यांच्या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
3/6
कलाकार, क्रिकेटर, खेळाडू, राजकीय नेत्यांसह सर्वांनीच विराटच्या निर्णायवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
4/6
विराटची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेदेखील विराटच्या प्रवासाबद्दल एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
5/6
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच एकमेकांना सपोर्ट करत असतात. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्याने अनुष्काने विराटच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्यासंदर्भात तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट केली आहे.
6/6
अनुष्काने लिहिले आहे,"2014 मधला तो दिवस मला आजही आठवतो, जेव्हा तू म्हणाला होतास की तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. कारण एमएसने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर एमएस, मी आणि तू आपण तिघे गप्पा मारत होतो. त्यावेळेस तो (धोनी) मस्करीत म्हणाला होता, तुझी दाढी किती लवकर राखाडी होईल. त्या दिवसापासून, मी तुझी दाढी राखाडी होण्याशिवाय बरेच काही पाहिले आहे. तुला यशस्वी होताना पाहिलं आहे. तेव्हापासून तुझ्य़ामध्ये आणि तुझ्या आजूबाजूला होणारा बदल मी पाहिला आहे. तुझ्या नेतृत्वात भारतीय संघाने मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे". (all photo:anushkasharma/ig)
Sponsored Links by Taboola