The Kashmir Files : अनुपम खेर ते मिथुन चक्रवर्ती, पाहा ‘द कश्मीर फाइल्स’साठी कलाकारांना किती फी मिळाली?
‘द कश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढीच उत्कटता या चित्रपटातील कलाकारांनी दाखवली असून, या मेहनतीचे फळही त्यांना मिळत आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील स्टार्सनीही चांगली कमाई केली आहे. चित्रपटात काम करण्यासाठी कोणाला किती फी मिळाली ते जाणून घेऊया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. यात त्यांनी IAS ब्रह्म दत्तची भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांना या चित्रपटासाठी सर्वाधिक फी मिळाली आहे. त्यांनी या भूमिकेसाठी 1.5 कोटी रुपये घेतले आहेत.
या चित्रपटात अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित यांची भूमिका साकारली असून, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी या भूमिकेसाठी एक कोटी रुपये घेतले आहेत.
अभिनेत्री पल्लवी जोशीच्या भूमिकेचे जितके कौतुक होत आहे, तितकेच लोक या भूमिकेचा तिरस्कारही करत आहेत. फीबद्दल बोलायचे झाले, तर या भूमिकेसाठी तिला 50 ते 70 लाख रुपये मिळाले आहेत.
या चित्रपटात अभिनेता दर्शन कुमारची भूमिकाही महत्त्वाची असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी त्याला 43 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णीही 'द कश्मीर फाइल्स'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांना या चित्रपटात काम करण्यासाठी 50 लाख रुपये मिळाले आहेत.
अभिनेते पुनीत इस्सार हे देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. सीनियर अभिनेता असल्याने त्यांना या चित्रपटासाठी 50 लाखांची ऑफर देण्यात आली होती.