अंकितानं कंगनाला सांगितलं सिक्रेट; म्हणाली..

(photo:lokhandeankita/ig)
1/6
अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'लॉकअप' (Lock Upp) हा शो सध्या चर्चेत आहे. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) नं हजेरी लावली.(photo:lokhandeankita/ig)
2/6
अंकिता पवित्र रिश्ता 2 (Pavitra Rishta 2) या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये उपस्थित होती. शोमध्ये आल्यानंतर कंगनानं अंकिताला तिचं एक सिक्रेट सांगायला लावले.(photo:lokhandeankita/ig)
3/6
त्यावेळी अंकितानं एक गोष्ट तेथील उपस्थित लोकांसोबत शेअर केली. ही गोष्ट ऐकून कंगना आणि शोमधील स्पर्धक शॉक झाले.(photo:lokhandeankita/ig)
4/6
अंकिताला जेव्हा कंगनानं सिक्रेट सांगायला लावले तेव्हा अंकिता म्हणाली, 'मी प्रेग्नंट आहे आणि ही गोष्ट विकीला पण माहित नाही.' हे ऐकताच कंगना आनंदी झाली.(photo:lokhandeankita/ig)
5/6
पण नंतर अंकितानं पुढे सांगितलं की, तिनं शोमधील स्पर्धकांना आणि कंगनाला एप्रिल फूल केलं. त्यावर कंगना म्हणाली, पण आज एक एप्रिल पण नाहिये. पण ही खोटी गोष्ट लवकरच खरी व्हावी, अशी मी आशा करते.(photo:lokhandeankita/ig)
6/6
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या स्मार्ट जोडी या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. रिपोर्टनुसार या कार्यक्रमाच्या एका एपिसोडचे विकी आणि अंकिता 7 लाख रूपये मानधन घेतात.(photo:lokhandeankita/ig)
Published at : 03 Apr 2022 05:36 PM (IST)