Ananya Panday :अनन्या पांडेचा 'कॉल मी बे' OTT वर खळबळ माजवणार, जाणून घ्या केव्हा आणि कुठे!
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या पांडे लवकरच तिच्या पहिल्या कॉमेडी वेब सीरिज 'कॉल मी बे'मधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे, ज्याबद्दल चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अलीकडेच सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच करण जोहरने या मालिकेची रिलीज डेट जाहीर केली आहे, त्यानंतर आता चाहते मालिकेच्या रिलीजची वाट पाहत आहेत.
सध्या अनन्या या मालिकेसाठी शूटिंग करत आहे. या मालिकेत अनन्या एका फॅशनिस्टाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आज, मालिकेच्या रिलीजची तारीख जाहीर करताना, निर्मात्यांनी सांगितले की ही मालिका 6 सप्टेंबर 2024 रोजी OTT वर प्रीमियर होणार आहे.
करणने या मालिकेचे एक पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे.
इशिता मोईत्रा निर्मित आणि कॉलिन डी'कुन्हा दिग्दर्शित या मालिकेत एकूण 8 भाग आहेत, ज्यामध्ये अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
त्याचबरोबर या मालिकेबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
अनन्या पांडेची पहिली कॉमेडी वेब सिरीज 'कॉल मी बे' 6 सप्टेंबर 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल.
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अनन्या फंकी लाल कपड्यांमध्ये दिसत आहे. तसेच अभिनेत्री मोकळ्या आकाशाखाली बसलेली दिसत आहे. (pc:ananyapanday/ig)