Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding : अमृता आणि प्रसाद 'या' ठिकाणी अडकणार लग्नबंधनात!

Amruta Deshmukh

1/11
'पुण्याची टॉकरवडी', 'बिग बॉस'फेम (Bigg Boss) अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/11
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. अमृता अभिनेत्री असण्यासोबत आरजेदेखील आहे. 98.3 मिर्चीमराठीवर एफएमवर तिचा 'टॉकरवडी' हा शो आहे.
3/11
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या पर्वातील त्यांची रोमँटिक केमिस्ट्री चांगलीच गाजली.
4/11
आता त्यांची ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात सत्यात उतरली आहे. अखेर आज अमृता आणि प्रसाद थाटामाटात लग्नबंधनात अडकणार आहेत.
5/11
अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. पण या पर्वात त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं.
6/11
पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. अखेर एकदिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं.
7/11
यामुळे त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. एकंदरीतच निसर्गाच्या सानिध्यात अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.
8/11
अमृता देशमुखने शेअर केलेल्या ग्रहमखाच्या फोटोपासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रमही जल्लोषात पार पडला आहे
9/11
या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच आता त्यांच्या लग्नसोहळ्यातही अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे.
10/11
अमृता आणि प्रसादच्या लग्नपत्रिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
11/11
बिग बॉसची थीम असणाऱ्या या पत्रिकेत अमृताने लिहिलेली कविताही आहे. प्रसाद-अमृताच्या गोड लव्हस्टोरीबद्दल भाष्य करणारी ही कविता आहे.
Sponsored Links by Taboola