आज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'पिकासो' चित्रपटाचा विशेष 'वर्ल्ड प्रिमिअर शो' प्रदर्शित
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'पिकासो'चा ट्रेलर सादर केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रिमिअर 19 मार्च 2021 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्लॅटून वन फिल्म्स अॅण्ड एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या बॅनरअंतर्गत शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले असून या चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, तसेच समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत.
'पिकासो' चित्रपट अस्वस्थ मद्यपी वडिल व मुलाच्या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवतो. 'पिकासो' चित्रपट सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल.
चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलताना दिग्दर्शक व सहाय्यक-लेखक अभिजीत मोहन वारंग म्हणाले, ''मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्सल व मूळ स्वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट 'पिकासो' सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता. त्यासाठी आम्ही वास्तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.
लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्या वालावल शहरामधील लक्ष्मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्ही या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. या चित्रपटासोबतच कलाकारांच्या जीवनातील दैनंदिन आव्हानांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्हणजे स्वत:लाच प्रश्न विचारत समस्यांचा सामना करण्याच्या नवीन पद्धतींचा शोध घेणे.''