PHOTO: आलियाची पोस्ट वादात; डिलीट करत म्हणाली..

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या हिट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तिच्या आरआरआर (RRR) आणि गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.(photo:aliaabhatt/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आलियानं सोशल मीडियावर आरआरआर (RRR) चित्रपटासंबंधित पोस्ट शेअर केली आणि नंतर ती पोस्ट एसएस राजामौली यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे डिलीट केली, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. आता आलियानं याबाबत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.(photo:aliaabhatt/ig)

आलियानं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं लिहिले, 'मी असं ऐकलं आहे की, आरआरआर चित्रपटासंबंधित पोस्ट मी डिलीट केली कारण मी या चित्रपटाच्या टीमवर नाराज आहे. मी सर्वांना विनंती करते की इंस्टाग्रामवरील ग्रीडवर विश्वास ठेवू नका. मी नेहमी माझ्या इन्स्टाग्राम ग्रीडवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. '(photo:aliaabhatt/ig)
आलियानं पुढे पोस्टमध्ये लिहिले, 'आरआरआर या चित्रपटामधील सीता ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. राजामौली सरांसोबत काम करून मज्जा आली. मी या चित्रपटाबद्दल पसरलेल्या चुकीच्या माहितीचा विरोध करते. '(photo:aliaabhatt/ig)
एक आठवड्यामध्ये या चित्रपटानं बहुबलीपेक्षा जास्त कलेक्शन झालं आहे. (photo:aliaabhatt/ig)
चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.(photo:aliaabhatt/ig)