Alia Ranbir Wedding: पूर्ण होणार आलियाचं स्वप्न; पाहा फोटो!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. विवाहपूर्व सोहळ्यासाठी दोघांचे कुटुंबीय वास्तूत पोहोचले आहेत. या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहतेही आतुर असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दोघांच्या लग्नाची झलक समोर येत असतानाच दुसरीकडे दोघांचे काही जुने व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलियाचा असाच एक जुना व्हिडिओ यावेळी चर्चेत आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट रणबीरसोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आलिया रणबीर कपूरला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिचे वय किती होते आणि तिच्या मनात काय चालले होते ते सांगत आहे.
व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, 'मी रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी 11 वर्षांची होते. संजय लीला भन्साळीच्या 'ब्लॅक' चित्रपटाच्या ऑडिशनला आलीया गेली होती आणि रणबीर या चित्रपटाला असिस्ट करत होता.
रणबीर हा आलियाचा बालपणीचा क्रश होता हे आता सर्वांनाच माहीत असेल. खुद्द आलियानेच कबूल केले आहे.
जेव्हा तिने रणबीरला पहिल्यांदा पडद्यावर पाहिले तेव्हाच तिने रणबीरशीच लग्न करायचे ठरवले होते. मात्र, तेव्हा आलिया खूपच लहान होती. पण आज त्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.(all photo:aliabhat insta)