In Pics | आलियाच्या गंगुबाई काठियावाडीचे शूटिंग दोन वर्षानंतर पूर्ण, पाहा फोटो
(Photo : @aliaabhatt instagram)
1/6
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Photo : @aliaabhatt instagram)
2/6
आलियाने लिहिले की, 8 डिसेंबर 2019 गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले होते आणि आता तब्बल 2 वर्षानंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.(Photo : @aliaabhatt instagram)
3/6
चित्रपटांच्या मेकिंग दरम्यान सेटने अनेक समस्यांचा सामना केला आहे. हा एक वेगळा चित्रपट आहे. हा आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय सरांसोबत चित्रपटात काम करणे हे माझे स्वप्न होते. गंगू आय लव यू! तुझी आठवण येईल. (Photo : @aliaabhatt instagram)
4/6
संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाची कथा 'द मॅडम ऑफ कामाठीपुरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर गंगुबाईंचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. (Photo : @aliaabhatt instagram)
5/6
तेथील महिलांना आर्थिक मदत करणं, त्यांच्या हक्कांसाठी लढणं यांसाठी त्यांना ओळखलं जातं. अशातच वेश्याव्यवसाय करताना कुख्यात गुंडांसोबतच्या ओळखी आणि त्यामुळे आयुष्यातील अनेक चढउतार आले. अशीच त्यांच्या संपूर्ण कहाणी या चित्रपटातून मांडणार आहे. (Photo : @aliaabhatt instagram)
6/6
आलिया पहिल्यांदाच एका लेडी गँगस्टरची भूमिका साकरणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आलियाच्या करियरला कलाटणी देणारा ठरू शकतो. (Photo : @aliaabhatt instagram)
Published at : 28 Jun 2021 07:53 PM (IST)