PHOTO: आलियाने शेअर केले हटके लुक्स; पाहा फोटो!
आलिया भट्ट सध्या यशाच्या पायऱ्या चढत आहे. तिचे चित्रपट सुरू असून नुकतेच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया भट्टचे आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 80 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर या यादीत आलिया भट्टचे नाव नक्कीच घेतले जाईल.
मेहनत आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने हे स्थान मिळवले आहे.
आलियाचा काही दिवसांपूर्वी रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर आता आलिया भट्ट तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
आलियाने नुकतेच तिचे वेगवेगळे लुक्स इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्रत्येक लूक मध्ये आलिया खूपच वेगळी आणि सुंदर दिसत आहे.
आलियाच्या डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया , गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच आलियानं बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं.तिची हार्ट ऑफ स्टोन ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली.