Alia Bhatt | मैत्रिणीच्या लग्नात आलियाचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक
आलिया भट्ट
1/5
सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे स्टार्स देखील आपल्या मित्रमंडळींच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आहेत.अभिनेत्री आलिया भट्ट देखील तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नात धमाल करताना दिसत आहे.
2/5
आलियाच्या बालपणीच्या मैत्रिणीचा विवाह असल्याने ती राजस्थानला गेली आहे. मैत्रिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला आलियाने इतर मैत्रिणींच्या तालावर ताल धरला आहे.
3/5
'फॅशन आयकॉन' आलियाने या लग्नसोहळ्यातही आपल्या स्टाइलने आपला हटके अंदाज दाखवला.
4/5
पारंपरिक पेहरावातही फॅशनेबल दिसणाऱ्या आलियाच्या स्टायलिश लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
5/5
आलिया लवकरच 'RRR'नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील आलियाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आलेला आहे. या चित्रपटात आलिया 'सिते'चे पात्र साकारणार आहे.
Published at : 25 Mar 2021 09:03 AM (IST)