Alia Bhatt : काय सांगता? आलीया भारतीय नाही?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (photo:aliaabhatt/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण अजून आलिया आणि रणबीरनं लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण रणबीरची होणारी पत्नी आलिया हिच्याकडे भारताचं नागकरित्व नाही. जाणून घेऊयात तिच्याबद्दल.... (photo:aliaabhatt/ig)
आलियाचा जन्म मुंबईमध्ये झाला. पण आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. (photo:aliaabhatt/ig)
त्यामुळे आलिया भारतामधील निवडणूकीमध्ये मतदान देखील करू शकत नाही. (photo:aliaabhatt/ig)
आलियानं नागरिकत्वाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. पुढच्या निवडणूकीमध्ये मी मतदान करेल. तोपर्यंत मला भारताचं नागरिकत्व मिळेल. ' भारतात दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था नाही. रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. 12 एप्रिल रोजी त्यांचे प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात होईल. (photo:aliaabhatt/ig)
नीतू सिंह यांना एका मुलाखतीमध्ये 'रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारिख काय आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'देवालाच माहिती', असं उत्तर दिलं. तर नीतू सिंह यांनी पुढे सांगितलं, 'मला सेलिब्रेट करायचं आहे, लोकांना देखील याबाबत सांगायचंय पण आजच्या पिढीतील मुलं थोडा वेगळा विचार करतात. मला त्यांच्या लग्नाबाबत काहीही माहित नाही. कारण ते दोघे त्यांच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतात. ते कधी लग्न करतील ते माहित नाही पण माझी इच्छा आहे की त्यांनी लवकरच लग्नगाठ बांधावी. आलिया खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांची छान जोडी होऊ शकते.' (photo:aliaabhatt/ig)