प्रेमाला वय नसतं... 85 वर्षीय अभिनेत्याचं 32 वर्षीय हॉट अभिनेत्रीशी पॅचअप? दोन वर्षांनंतर पुन्हा डिनर डेटवर भेटले

85-Year-Old Al Pacino Reunites With 32-Year-Old Noor Alfallah: अल पचिनो आणि नूर अल्फल्लाह दोन वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले आहेत.

Continues below advertisement

85-Year-Old Al Pacino Reunites With 32-Year-Old Noor Alfallah

Continues below advertisement
1/8
प्रेमाला कोणत्याही बंधनाची गरज नसते. प्रेमात पडल्यावर वय, रंग, जाती-पाती किंवा समाजाची नजर महत्त्वाची ठरत नाही. सिनेसृष्टीत असे अनेक जोडपे आपण पाहिले आहेत, ज्यांच्यात वयाचा मोठा गॅप असतानाही त्यांचा प्रेमबंध मजबूत आहे.
2/8
वयाच्या मोठ्या फरकामुळे हॉलिवूडमधील ही जोडी सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्याचं वय 85 असून, तर अभिनेत्रीचं वय 32 असल्याची माहिती आहे.
3/8
अल पचिनो असे अभिनेत्याचं नाव असून, नूर अल्फल्लाह असे अभिनेत्रीचं नाव आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून डेट करत असल्याची माहिती आहे.
4/8
मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. मात्र, दोघांना पुन्हा एकदा एकत्र लॉस एंजिलिसमध्ये स्पॉट करण्यात आलं.
5/8
पेज सिक्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, या कपलला सॅन व्हिसेंट बंगल्याच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं. तब्बल दोन वर्षांनंतर ते दोघे एकत्र दिसले.
Continues below advertisement
6/8
दरम्यान, दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांची भेट का घेतली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
7/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल पचिनो आणि नूर दोघांना मिळून एक मुलगा आहे. 2023 मध्ये तिनं मुलाला जन्म दिला होता.
8/8
वयाच्या 83 व्या वर्षी अल पचिनो चौथ्यांदा वडील झाले होते. दरम्यान, एका मुलाखतीत अल पचिनो यांनी स्वत:ला अविवाहित आणि सिंगल असल्याचं म्हटलं होतं.
Sponsored Links by Taboola