Akshaya Hardeek Wedding : असा पार पडला, राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळा!

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.

नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा पाठकबाईंचा नववधू साज आहे.
नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला आहे. दोघांचाही पेहराव दिमाखदार होता.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रिसेप्शनला अक्षयाने जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर, हार्दिकने देखील जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे.
राणादा आणि अंजली पाठक बाई दोघेही या गेटअपमध्ये फारच सुंदर दिसत होते.
लग्नात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा फॅमिली फोटोसुद्धा पाहायला मिळाला.
नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला होता
हार्दिकचा हा लूक चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत आहे