आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती

चित्रपटांनंतर आता टीव्हीवरही ‘खिलाडी कुमार’चा जलवा पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या शोबाबत सविस्तर माहिती.

Continues below advertisement

Akshay Kumar

Continues below advertisement
1/8
बॉलिवूड सुपरस्टार्सनी टीव्ही रिअॅलिटी शो होस्ट करणं आता नवीन राहिलेलं नाही. सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आमिर खान आणि करण जोहर यांच्यानंतर आता या यादीत अक्षय कुमारचंही नाव सामील झालं आहे. लवकरच अक्षय कुमार एका मोठ्या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
2/8
‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे जगभरात लोकप्रिय आहे. आता तो तब्बल 60 देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिअॅलिटी शोचा होस्ट होणार आहे. या घोषणेनंतर अक्षयच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.
3/8
‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ हा एक जुना आणि लोकप्रिय गेम शो असून तो 1975 पासून प्रसारित होत आहे. आता हा शो भारतीय टेलिव्हिजनवर नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे.
4/8
या शोमध्ये अक्षय कुमार स्पर्धकांना प्रश्न विचारतील. त्यानंतर एक मोठं व्हील फिरवलं जाईल आणि जिथे व्हील थांबेल, त्या रकमेवर स्पर्धकांची जिंक निश्चित होईल.
5/8
60 देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या शोमध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या कॅटेगरीमधून प्रश्न निवडण्याची संधी मिळते. प्रश्नाशी संबंधित एक पझल स्क्रीनवर दाखवला जातो आणि तो पझल सोडवून स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम जिंकता येते. अक्षय कुमारचा ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ही याच फॉरमॅटवर आधारित असणार आहे.
Continues below advertisement
6/8
महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ या दोन्ही शोमध्ये मोठा फरक आहे. ‘केबीसी’ हा पूर्णपणे जनरल नॉलेजवर आधारित आहे, तर ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’मध्ये पझलसोबतच नशिबालाही तितकंच महत्त्व दिलं जातं.
7/8
सध्या तरी अक्षय कुमारच्या या नव्या शोचा प्रोमो रिलीज झालेला नाही. मेकर्सनी फक्त पोस्टर शेअर करत ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांच्या क्विझ रिअॅलिटी शो नंतरच ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’चं प्रसारण सुरू होण्याची शक्यता आहे.
8/8
बॉलिवूडमधील इतर सुपरस्टार्सप्रमाणेच आता अक्षय कुमारही टेलिव्हिजन रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे.
Sponsored Links by Taboola