Akshay Kumar Birthday : वेटर ते सुपरस्टार... अक्षयकुमारचा भन्नाट जीवनप्रवास, आताची कमाई पाहून थक्क व्हाल
बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करुन सुपरस्टार बनलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार आघाडीवर आहे. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय.(Photo : @akshaykumarofficial/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय कुमार म्हणजेच राजीव हरी ओम भाटिया. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता. त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे.(Photo : @akshaykumarofficial/FB)
अक्षयने सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.(Photo : @akshaykumarofficial/FB)
त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.अभिनेता झालो नसतो तर...मी जर अभिनेता झालो नसतो तरी मी मार्शल आर्ट ट्रेनर असतो, असं अक्षय कुमारने अनेक मुलाखतीतून सांगितलं आहे.(Photo : @akshaykumarofficial/FB)
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अक्षय कुमार बँकॉकमधल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.(Photo : @akshaykumarofficial/FB)
मायानगरीत दाखल झाल्यानंतर अक्षयने सुरुवातीला लाईट बॉय म्हणून काम केलं. ज्याच्या बदल्यात त्याला त्याचा पोर्टफोलिओ बनवून मिळाला.(Photo : @akshaykumarofficial/FB)
1991 मध्ये आलेला 'सौगंध' हा अक्षय कुमारच्या कारकीर्दीतला पहिला सिनेमा. राज सिप्पी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.(Photo : @akshaykumarofficial/FB)
ट्विंकल खन्नामुळेच आपलं आयुष्य बदललं असल्याचं अक्षय मानतो. कारण त्यांच्या लग्नाआधी अक्षयचे सलग 14 सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.(Photo : @akshaykumarofficial/FB)