Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai? Upcoming Marathi Movie: सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' शीर्षक गीत प्रदर्शित
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai? Upcoming Marathi Movie: सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? शीर्षक गीत प्रदर्शित
Continues below advertisement
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai? Upcoming Marathi Movie: सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'
Continues below advertisement
1/7
मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट 16 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/7
या चित्रपटाचे पहिले गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू त्यातून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे आणि ते खूप मजेदार आहे
3/7
या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. एकूणच हे गाणे ऐकायला जितके मजेदार आहे, तितकेच त्याचे सादरीकरणही लक्षवेधी ठरते आणि प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल.
4/7
गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून त्यांच्या शब्दांतून सासू-सुनेच्या नात्यातील खट्याळपणा आणि आपुलकी सहजपणे लक्षात राहाणारे शब्द गाण्याला अधिक प्रभावी बनवतात.
5/7
गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते आणि 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे."
Continues below advertisement
6/7
निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत कमाल दिसत असून त्यांची धमाल केमिस्ट्री आणि सहज अभिनय गाण्याच्या मस्तीला आणखी उठाव देतो.
7/7
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित हा धमाल चित्रपट 16 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.
Published at : 24 Dec 2025 11:01 AM (IST)