अपघातानंतर मलायकानं एक पोस्ट शेअर करून चाहत्यांनी दिली तिच्या तब्येतीबाबत माहिती; म्हणाली..

(photo:/malaikaaroraofficial/ig)
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) चा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात मलायकाला दुखापत झाली.(photo:/malaikaaroraofficial/ig)
2/6
मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीजवळील बोरघाटात अपघात झाला. आता अपघातानंतर मलायकानं एक पोस्ट शेअर करून चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.(photo:/malaikaaroraofficial/ig)
3/6
मलायकानं तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये डॉक्टरांचे आभार मानले आहेत.(photo:/malaikaaroraofficial/ig)
4/6
मलायकानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटना अगदी अविश्वसनीय होत्या. या घटनेबाबत विचार करणे म्हणजे एखाद्या चित्रपटाचा सिन आठवण्यासारखे आहे. माझी काळजी घेतल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॉलोअर्सकडून मला मिळालेले प्रेमामुळे मी आनंदी झाले. मी आता यामधून रिकव्हर होत आहे.'(photo:/malaikaaroraofficial/ig)
5/6
मलायकानं शेअर केलेल्या पोस्टला करिना कपूर, ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर आणि बिपाशा बासू या अभिनेत्रींनी कमेंट केल्या आहेत.(photo:/malaikaaroraofficial/ig)
6/6
तसेच मलायकाच्या चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.(photo:/malaikaaroraofficial/ig)
Published at : 10 Apr 2022 04:44 PM (IST)