In pics | अनेक दिवसांच्या दुराव्यानंतर लक्षवेधी पोस्ट करत रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सक्रिय

1/5
अखेर या अडचणीचा काळ पार करत रिया सोशल मीडियाच्या या विश्वात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तिनं एक अतिशय लक्षवेधी अशी पोस्ट केली आहे.
2/5
महिला दिनाच्या शुभेच्छा देत रियानं तिच्या आईचा हात हातात घट्ट पकडलेला एक अतिशय बोलका फोटो पोस्ट केला आहे. एक महिला जिनं आपल्याला आधार दिला, प्रेरणा दिली, सक्षम केलं असं म्हणत त्याच महिलेचं आपल्या जीवनातील स्थान तिनं या पोस्टच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आणलं.
3/5
जागतिक स्तरावर महिला दिन बहुविध परिंनी साजरा केला जात आहे. नारीशक्तीचा जागर सुरु असताना आणि या अद्वितीय अशा शक्तीच्या प्रतीकाला सलाम करत असतानाच अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे.
4/5
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सुशांतची कथित प्रेयसी असणाऱ्या रियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रोषालाही तिला सामोरं जावं लागलं होतं.
5/5
आतापर्यंतच्या प्रवासात रियाला तिच्या आईचा मोठा आधार मिळाल्याचंच तिची ही पोस्ट आणि त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन पाहून लक्षात येत आहे. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)
Sponsored Links by Taboola