राजकारणात आल्यानंतर अरुण गोविल मनोरंजनसृष्टीला राम-राम करणार?
छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल (Arun Govil) घराघरांत पोहोचले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अरुण गोविल यांना प्रभू राम म्हणूनच पाहिलं जातं. अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आता लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात एन्ट्री केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अरुण गोविल आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप उत्साही आहेत. नुकतेच त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. एका मुलाखतीत अरुण गोविल यांनी राजकारणानंतर अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्याबाबत सांगितले की,अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे.
अरुण गोविल पुढे म्हणाले,याआधीदेखील मला राजकीय पक्षांकडून निवडणुकीला उभं राहण्याची विचारणा झाली आहे. पण त्यावेळी राजकारणात येण्याचा मी काहीही विचार केला नव्हता. राजकारणाचा प्रवास कसा होतोय यावर पुढची गणितं अवलंबून असतील. सध्या मी यावर उघडपणे काहीही बोलू इच्छित नाही. सध्यातरी माझं संपूर्ण लक्ष आगामी निवडणुकांवर आहे.
'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील अरुण गोविल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना हे फोटो पाहता आले नव्हते. अरुण गोविल सध्या त्यांच्या 'रामायण' चित्रपटांचं शूटिंग करत आहेत.
नितेश तिवारी 'रामायण' तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात सनी देओल हनुमानाची तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे
याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखा आणि विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे. (photo:siyaramkijai/ig)