हार्दिकसोबत काडीमोड होताच नताशाला मिळालं नवं प्रेम? नेमकं कुणाला करतेय डेट

गेल्या महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्याची चांगलीच चर्चा होती. त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चेनंतर गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात या दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोट घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हे दोघेही एकमेकांसोबत साधारण चार वर्षे पती-पत्नी म्हणून राहिले. त्यांना अगस्त्या नावाचा एक गोड मुलगा आहे. या दोघांचाही ते को-पॅरेन्ट म्हणून सांभाळ करत आहेत.

दरम्यान, आता हार्दिक पांड्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविक आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं बोललं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार ती अलेक्झांडर अॅलेक्स याला डेट करत असल्याचं बोललं जातंय.
अलेक्झांडर अॅलेक्स हा सायबेरिय मॉडेल असून तो फिटनेस ट्रेनरदेखील आहे. नताशा अॅलेक्ससोबत अनेकवेळा स्पॉट झालेली आहे.
विशेष म्हणजे अलेक्झांडर अॅलेक्सनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर नताशासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
याआधीही ते दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. हे दोघेही सोशल मीडियावर बिनधास्त फोटो शेअर करतात.
दरम्यान, हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या फक्त अफवा आहेत. याबाबत दोघांनही अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
नताशा आणि अलेक्झांडर