Dhurandhar Ranveer Singh: 'धुरंधर'तर फक्त ट्रेलर होता...रणवीर सिंहच्या खात्यात 4 बिग बजेट सिनेमे; पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवणार?
Ranveer Singh upcoming movies: धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
Continues below advertisement

Ranveer Singh upcoming movies
Continues below advertisement
1/8
रणवीर सिंहला'धुरंधर' या सिनेमामुळे जगभरात ओळख मिळाली. या सिनेमाने जगभरात धुरळा उडवत छप्परफाड कमाई केली. रणवीर सध्या आयकॉनिक स्टार झाला आहे.
2/8
2010 साली रिलीज झालेल्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यानंतर त्यानं अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. पण त्याला खरी जागतिक ओळख 'धुरंधर' या सिनेमामुळे मिळाली.
3/8
फक्त 'धुरंधर' नाही तर, तो अपकमिंग प्रोजेक्ट्समधून तो लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.
4/8
जय मेहता दिग्दर्शित 'प्रलय' हा सिनेमा बिग बजेट सिनेमा आहे. हा एक जॉम्बी थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात रणवीर लीड रोलमध्ये झळकणार आहे. सध्या या प्रोजेक्टवर काम सुरू आहे.
5/8
रणवीर सिंह 'इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
6/8
लेखक अमिश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या सिनेमाविषयी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
7/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह लवकरच भव्य ऐतिहासिक सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात रणवीर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
8/8
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' या सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात रणवीर सिंहचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळणार आहे.
Published at : 06 Jul 2026 10:59 PM (IST)