गुडन्यूज, आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल लवकरच होणार आई-वडील!

Shweta Agarwal

1/6
बॉलिवूड अभिनेता-गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) लवकरच आई-वडील होणार आहेत.
2/6
या जोडप्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
3/6
आदित्यने सोशल मीडियावर लिहिले की, ‘श्वेता आणि मी लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.’
4/6
या फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत.
5/6
आदित्यने त्यांच्या मॅटर्निटी शूटमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी क्रॉप टॉपमध्ये बेबी बंप फ्लाँट करत आहे.
6/6
आदित्य आणि श्वेता यांनी ‘शपित’ (2010) या चित्रपटात एकत्र काम केले होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आदित्य आणि श्वेता यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते. (all photo credit : adityanarayanofficial/ig)
Sponsored Links by Taboola