भांगेत सिंदूर, कपाळावर बिंदी आणि गुलाबी रंगाचा सूट.. नवरा सिद्धार्थचा हात धरून आदिती झाली स्पॉट!

गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी या जोडप्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

aditi rao hydari

1/11
अदिती राव हैदरीने 16 सप्टेंबर रोजी तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि अभिनेता सिद्धार्थसोबत गुपचूप लग्न केले.
2/11
दोघांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मात्र, त्यांच्या लग्नामुळे चाहतेही खूप खूश होते.
3/11
आता लग्नाच्या 4 दिवसांनंतर दोघेही मुंबई विमानतळावर पहिल्यांदाच एकमेकांचा हात धरताना दिसले. दोघांचा एक अतिशय क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.
4/11
व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे अदिती लग्नानंतर तिच्या साध्या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे आणि ती लाजलेली दिसत आहे.
5/11
व्हिडिओमध्ये अदिती गुलाबी रंगाच्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
6/11
यावेळी सिद्धार्थने डेनिम शर्ट, ब्लॅक ट्राउझर्स आणि ब्लॅक-व्हाइट कॉन्व्हर्स शूज घातले होते.
7/11
लग्नानंतर सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी पहिल्यांदाच पापाराझींसमोर आले होते. फोटो आणि व्हिडीओ काढण्यासोबतच पापाराझी दोघांना लग्नासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत.
8/11
दोघेही 2021 पासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर दोघांनी यावर्षी मार्चमध्ये एंगेजमेंट केले आणि आता सप्टेंबरमध्ये गुपचूप लग्न केले. या दोघांचे हे दुसरे लग्न आहे.
9/11
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचा विवाह 16 सप्टेंबर रोजी तेलंगणातील वानापर्थी येथील 400 वर्ष जुन्या श्रीरंगपूर मंदिरात झाला. या लग्नात कुटुंबीयांव्यतिरिक्त काही जवळचे मित्र उपस्थित होते.
10/11
त्यानंतर दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले. यादरम्यान दोघेही साऊथच्या पारंपरिक लूकमध्ये दिसले.
11/11
दोघांनीही दाक्षिणात्य पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केले. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छा दिल्या.(pc:मानव मंगलानी )
Sponsored Links by Taboola