PHOTO : लाखात एक... दिसते सुरेख! तेजस्वीच्या फोटोंवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
छोट्या पडद्यावरची अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची जोडी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजते आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानच्या ‘बिग बॉस 15’च्या घरात हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. इथून सुरु झालेले त्यांचे नाते ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही टिकून राहिले आहे.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट होत असते. तर, दोघांनीही लवकरात लवकर लग्न करून एकमेकांचे कायमचे सोबती व्हावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
या सगळ्या चर्चां दरम्यान अभिनेत्री सतत स्वतःचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एक खास फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये तेजस्वीने क्रीम कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. हा रंग तिच्यावर खूपच खुलून दिसतो आहे.
‘नागिन 6’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या या नव्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Photo : @tejasswiprakash/IG)