PHOTO: सोनाली कुलकर्णी साडीत दिसते खास; हातात कमळ घेऊन केलं फोटोशूट!

सोनाली एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि लेखिका देखील आहे.

सोनाली कुलकर्णी

1/9
बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.
2/9
पण तिला खरी ओळख 'दायरा' या हिंदी चित्रपटातून मिळाली. सोनाली कुलकर्णीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
3/9
सोनाली एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि लेखिका देखील आहे.
4/9
तिने मराठी ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 70 हून अधिक चित्रपट केले आहेत.
5/9
'दिल चाहता है' आणि 'मिशन कश्मीर' हे तिचे बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट आहेत. 2004 मध्ये आलेल्या ब्राईड अँड प्रीज्युडाईस या हॉलिवूड चित्रपटातही सोनाली कुलकर्णीने काम केलं आहे
6/9
सोनाली कुलकर्णीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड चित्रपटामधून केली.
7/9
1992 मध्ये तिला गिरीश कर्नाड यांच्याकडून 'चेलुवी' चित्रपटासाठी पहिली ऑफर मिळाली.
8/9
सोनालीने सध्या एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती पर्पल साडीमध्ये दिसत आहे.
9/9
हातात कमळ घेऊन तिने हे फोटोशूट केलं आहे.
Sponsored Links by Taboola