अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मनमोहक अवतार; 'थिंक पिंक' म्हणत फोटो केले शेअर!
आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाली बेंद्रे 'मिशन सपने', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज बेस्ट ड्रामे बाज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'हम साथ साथ है', 'चल मेरे भाई' आणि 'लज्जा' या सिनेमातील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
4 जुलै 2018 रोजी सोनालीनं सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते.
'बस इतनासा ख्वाब है' या सिनेमाच्या माध्यमातून सोनालीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सोनाली बेंद्रे ही 90 च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री आहे
सध्या ती जाहिरात आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
सोनालीने नुकताच तिचा एक नवा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा को ओर्ड सेट घातला आहे.