Sonali Bendre : 90 च्या दशकातील मुलांची क्रश…, सोनाली ब्रेंद्रेच्या ग्लॅमरस लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा!
सोनालीने हम साथ साथ है, हमारा दिल आपके पास है, सरफरोश यांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सोनाली बेंद्रे
1/9
सोनाली बेंद्रेने १९९४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी गोविंदासोबत 'आग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
2/9
१९९६ मध्ये, तिला शाहरुख खानसोबतच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम' मधून लोकप्रियता मिळाली.
3/9
हा चित्रपट परदेशात यशस्वी झाला. यानंतर तिने अजय देवगणसोबत दिलजले मध्ये काम केलं.
4/9
सोनालीने हम साथ साथ है, हमारा दिल आपके पास है, सरफरोश यांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/9
त्याचबरोबर सोनालीने चिरंजीवींच्या विरुद्ध इंद्र, खडगम आणि मनमधुडू यांसारख्या चित्रपटांसह तेलुगू चित्रपटातही यश मिळवलं.
6/9
सोनालीने २०२२ मध्ये द ब्रोकन न्यूज द्वारे ओटीटी पदार्पण केलं. अलीकडेच ती रेमो डिसूझाच्या बी हॅपी चित्रपटात एका खास कॅमिओमध्ये दिसली.
7/9
सोनालीने एकी नवा लूक शेअर केला आहे, यात ती ब्लॅक ब्लेझर मध्ये दिसत आहे.
8/9
काळ्या रंगाचं ब्लेझर आणि त्यावरचं नक्षीकाम खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
मोकळे केस आणि स्मोकी मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 16 May 2025 11:29 AM (IST)