#partnerworkout : प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णीचा फिटनेस फंडा
लॉकडाऊन काळातील जीवशैलीमुळं अनेकजण आता काही नवीन पर्यायांचा अवलंब करत असून, या नव्या मार्गांनी सुदृढ राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेही मागे नाहीत.
प्रार्थना सध्या तिच्या चित्रकलेसोबतच फिटनेसलाही प्राधान्य देत आहे.
सोनाली कुलकर्णी हिच्यासोबत तिनं #partnerworkout हा फंडा आपलासा केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णीही तिच्या या वर्कआऊट सेशनचे फोटो पोस्ट करताना दिसते.
व्यायाम करणं हा सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेरणादायी ठरणारा एकमेव मार्ग आहे, असं म्हणत सोनाली सर्वांचं लक्ष वेधत आहे.
व्यायाम करण्यात सातत्य राखल्यानंतर शरीरात दिसणारे बदल सुखावह असतात असंही ती सांगताना दिसते.
सोनाली आणि प्रार्थनाचा हा फिटनेस फंडा सध्या इतरांनाही या लॉकडाऊन काळात प्रेरणा देऊन जात आहे.