Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ग्लॅम लूक; दिसतेय बॉस लेडी!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या 'दबंग' सिनेमामधून २०१० साली बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री बॉलिवूडमध्ये दीर्घकाळापासून आहे, मात्र तिने या कालावधीत तिच्या नावावर असणाऱ्या हिटची संख्या तशी कमी आहे.
अभिनेत्रीने शत्रुघ्न सिन्हा यांची लेक म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती, मात्र आज तिची अशी स्वत:ची ओळख आहे.
अलीकडेच संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज 'हीरामंडी'मध्ये तिने फरिदन या पात्राद्वारे प्रेक्षकांना मोहिनी घातली.
सोनाक्षी सिन्हाने 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितले होते की, जेव्हा तिचा डेब्यू सिनेमा आला त्यावेळी तिचे वजन ९५ किलो होते.
सोनाक्षी सिन्हाने 'दबंग', 'रावडी राठोड', 'जोकर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग २', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', 'आर. राजकुमार', 'हॉलिडे', 'ॲक्शन जॅक्सन', 'तेवर', 'अकिरा', 'नूर', 'फोर्स २', 'इत्तेफाक', 'न्यूयॉर्क', 'हॅपी फिर भाग जायगी', 'कलंक',' 'खानदानी शफाखाना', 'मिशन मंगल', 'दबंग ३', 'भुज - प्राइड ऑफ इंडिया', 'डबल एक्सएल' सारखे चित्रपट केले आहेत.
सोनाक्षी मुंबईत फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2024मध्ये पोहचली होती, ज्यात तिने काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसली.
मॅचिंग पर्स घेऊन तिने हा लूक पूर्ण केला आहे.
काही सिनेमांमध्ये सोनाक्षीने कॅमिओही केला आहे. तिने 'दहाड' आणि 'हिरामंडी' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले असून विविध म्युझिक व्हिडिओ केले आहेत.