PHOTO: 'या' कारणामुळे आता एकाकी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री!
(photo:shilpa_shinde_official/ig)
1/7
Shilpa Shinde : टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) हिचे नाव देखील गणले जाते. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी तिला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या शोमधून मिळाली.(photo:shilpa_shinde_official/ig)
2/7
या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत वर्षानुवर्षे जीव ओतून काम केल्यानंतर शिल्पाने हा शो सोडला होता.(photo:shilpa_shinde_official/ig)
3/7
टवर आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने मालिकेला अलविदा म्हटले होते.(photo:shilpa_shinde_official/ig)
4/7
यानंतर शिल्पाच्या जागी अभिनेत्री शुभांगी अत्रेने ‘अंगुरी भाभी’ बनून शोमध्ये प्रवेश केला आणि प्रकरण मिटले. तसे, व्यावसायिक जीवनातील वादासाठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पाचे वैयक्तिक आयुष्यही कमी वादग्रस्त नाही.(photo:shilpa_shinde_official/ig)
5/7
सगळी तयारी झाली होती, घरात लग्नाची धामधूम सुरु होती आणि त्याचवेळी शिल्पाचे लग्न मोडले होते. अभिनेत्री शिल्पा शिंदे एकेकाळी टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती.(photo:shilpa_shinde_official/ig)
6/7
‘मायका’ या मालिकेदरम्यान रोमित राजसोबत शिल्पाची जवळीक वाढली आणि त्यांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेटही केले. 2009 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे लग्न निश्चित झाले होते. सर्व काही ठीक सुरु होते, पण अचानक असे काही तरी घडले की, लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी दोघांनी एकमेकांच्या संमतीने हे लग्न मोडले. त्यानंतर शिल्पाने आजतागायत दुसरे लग्न केले नाही. 44 वर्षांची अभिनेत्री आजही एकाकी जीवन जगत आहे.(photo:shilpa_shinde_official/ig)
7/7
शिल्पाने आयुष्यातील आणखी एक वाईट टप्पा पाहिला होता, जेव्हा तिच्या वडिलांचा अल्झायमरने मृत्यू झाला. शिल्पा तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती आणि त्यांच्या मृत्यूमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. शिल्पाचे वडील तिच्या अभिनय कारकिर्दीच्या विरोधात होते आणि तरीही त्यांच्या विरोधात जाऊन ती अभिनेत्री बनली.
Published at : 31 Mar 2022 11:58 AM (IST)