PHOTO : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम कीर्तीचा घायाळ करणारा अंदाज!
‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत ‘कीर्ती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या खूप चर्चेत आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच अभिनेत्री समृद्धी केळकर हिने सोशल मीडियावर अस्सल मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहे.
समृद्धीच्या या फोटोंवर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह कलाकारांनी देखील तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मालिकेत कीर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कीर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र अखेर जिजी अक्कांनी होकार दिल्यानंतर कीर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे.
आयपीएस ऑफिसर बनण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यासाठी लागणार आहे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी. कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान असणार आहे.
मालिकेच्या पहिल्या दिवसापासून कीर्तीच्या आयपीएस ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत. कीर्तीसाठी हे आव्हानात्मक असेलच पण समृद्धी म्हणून माझी कसोटी लागणार आहे, असं अभिनेत्री समृद्धी म्हणते. (Photo : @samruddhi.kelkar/IG)