Samantha: हिंदी भाषेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर समंथानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष..
Samantha : पुष्पा द राइज या (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते. समंथा मुंबई एअपोर्टवर असाताना नुकताच एका व्यक्तीनं तिला प्रश्न विचारला की, 'तुला हिंदी बोलता येतं का?'. या प्रश्नाला समंथानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
एका फोटोग्राफरनं समंथाला प्रश्न विचारला कि तुला हिंदी बोलता येतं का? यावर समंथानं उत्तर दिलं की,'हो थोडं थोडं येतं' . समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे.
तिच्या चित्रपटांना चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. लवकरच समंथाचा 'शकुंतलम'हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिनं या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.
अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा चर्चेत आली.
6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी समंथा आणि नाग चैतन्य यांचा त्यांचा घटस्फोट झाला. (all photo:samantharuthprabhuoffl/ig)