प्रियांका चोप्राचं शूज कलेक्शन; वॉर्डरोबचा फोटो केला शेअर
अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर अमेरिकेत असूनही प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडित अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.
प्रियांकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकाने व्हाईट कलरचा एक क्रॉप टॉप घातला असून ग्रीन कलरची लोअर आणि डेनिम शर्ट कॅरी केलं आहे.
या फोटोत प्रियांकाच्या वॉर्डरोबमधील फूटवेअर कलेक्शन दिसून आले. यामध्ये प्रियांकाकडे वेगवेगळ्या फूटवेअरचे प्रकार दिसत आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स हे नुकतंच एका मुलीचे पालक झाले आहेत. मालती जोन्स चोप्रा असे या चिमुकलीचे नाव आहे.