प्रपंच मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम केले.

prema sakhardande

1/5
प्रपंच या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रेमा साखरदांडे यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे.
2/5
प्रेमा साखरदांडे यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशभांडे, आशा दंडवते सिनेक्षेत्रात कार्यरत आहेत.
3/5
प्रेमा साखरदांडे यांनी मुंबईतील शारदा सदन येथे मुख्याध्यापिका म्हणूनही काम केलेले आहे.
4/5
त्यांनी स्पेशल 26, द इम्पॉसिबल मर्डर, साविभी बानो, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुल 3 धमाल अशा अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांत काम केलेले होते.
5/5
प्रपंच या मराठी मालिकेत त्यांनी केलेली भूमिका आजही स्मरणीय आहे. तेव्हा ही मालिका चांगलीच गाजली होती.
Sponsored Links by Taboola