प्रिती झिंटाला किती कोटींची कर्जमाफी मिळाली?
Actress Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला किती कोंटी कर्जमाफी मिळाली? जाणून घेऊयात..
Continues below advertisement
Actress Preity Zinta
Continues below advertisement
1/10
Actress Preity Zinta : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकसोबत प्रिती झिंटाचं कनेक्शन समोर आलंय. या बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये? दरम्यान प्रितीने या बँकेतून 18 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
2/10
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिला 18 कोटी रुपयांच्या कर्जात 1.55 कोटींची सूट देण्यात आली आहे.
3/10
या रक्कमेला बँकेने non performing asset म्हणून वर्गीकृत केलं होतं.
4/10
यातून प्रितीला 1.55 कोटींचा दिलासा मिळालाय. म्हणजेच 18 कोटींमधील कर्जात प्रिती झिंटाला सूट मिळालीये.
5/10
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती झिंटाला 2011 मध्ये कर्ज मंजूर करण्यात आले होते आणि अभिनेत्रीने एप्रिल 2014 मध्ये त्याची परतफेड केली होती. सध्या मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची चौकशी करत आहे.
Continues below advertisement
6/10
याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक आणि खातेप्रमुख हितेश मेहता यांचाही समावेश आहे, ज्यांना 15 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.
7/10
तपासादरम्यान अभिनेत्री प्रीती झिंटाने बँकेकडून कर्ज घेतल्याचे आढळून आले. प्रितीला 7 जानेवारी 2011 रोजी 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.
8/10
तिने बँकेकडे स्वत:ची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज घेतलं होतं. ज्यात मुंबईतील एक फ्लॅट आणि शिमला येथील एक मालमत्ता होती. ज्याची एकूण किंमत 27.41 कोटी रुपये होती. नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांना 11.40 कोटी रुपये बँकेत परत करायचे होते.
9/10
31 मार्च 2013 रोजी तिचे कर्ज खाते वेळेवर न भरल्याने अ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले. त्यावेळी ही रक्कम 11.47 कोटी रुपये होती.
10/10
यानंतर बँकेने कर्जाच्या अंतिम सेटलमेंटवर 1.55 कोटी रुपयांची सूट दिली. अभिनेत्रीने 5 एप्रिल 2014 रोजी उर्वरित कर्जाची परतफेड केली.
Published at : 29 Mar 2025 12:59 PM (IST)