PHOTO : प्रार्थनाचं सुंदर रूप पाहून चाहतेही म्हणतायत, ‘इश्क का रंग सफेद...’

Prarthana Behere

1/7
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत नेहा बनून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
2/7
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
3/7
सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्रार्थना आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
4/7
नुकतेच अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
5/7
पांढरी साडी, हिरवा ब्लाऊज, मोकळे केस, हलका मेकअप आणि खट्याळ अदांनी प्रार्थना चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थनाचं हे सुंदर रूप फोटोग्राफर आर्तिक कवाडकर यांनी आपल्या कॅमेरात कैद केलं आहे.
6/7
मालिकांबरोबरच ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ या मराठी चित्रपटांतही प्रार्थना झळकली होती.
7/7
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. यशच्या प्रेमात असलेल्या नेहासाठी आता सगळं वातावरण गुलाबी झालं आहे. लवकरच मालिकेत नावी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Sponsored Links by Taboola