In Pics : मराठमोळी मीरा जोशी वेबसीरिजमध्ये झळकली, 'इंदोरी इश्क'मध्ये नवा अंदाज
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी आता हिंदी वेब सिरीजमध्ये झळकली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदोरी इश्क’ वेबसिरीजमध्ये ती एका साध्याभोळ्या भूमिकेत आली आहे.
या भूमिकेसाठी तिचे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन झाले होते. घरच्या घरी ऑडिशन दिल्यानंतर मीराची यासाठी निवड करण्यात आली.
समीत कक्कड दिग्दर्शित ही नऊ भागांची वेब सिरीज आहे. लेखक कुणाल मराठे यांच्या ‘थर्की’ या पुस्तकावर आधारित आहे.
या वेबसीरिजमध्ये मीरानं आलिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
याबाबत मीरानं सांगितलं की, प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार न करता प्रेमात रमणारी मुलगी आहे.
ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात कुणालची एंट्री होते. पुढे तिचं आयुष्य तिला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतं याबाबत या वेबसीरिजमधून पाहायला मिळणार आहे.
हे सर्व फोटो मीरा जोशीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत.