Maahi Vij : जय भानुशालीची बायको माही विजचा ग्लॅमरस लूक; निळ्या लेहेंग्यात दिसतेय खास!
लागी तुझसे लगन या मालिकेत नकुशाची भूमिका साकारल्यानंतर घराघरात लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री वयाच्या १७ व्या वर्षी ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी मुंबईत राहायला आलेली.
माही विज
1/10
सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारी माही विज 43 वर्षांची असतानाही खूपच तरुण आणि सुंदर दिसते.
2/10
सोशल मीडियावर, चाहते अनेकदा अभिनेत्रीला तिच्या सौंदर्याचे रहस्य विचारत असतात.
3/10
१९८२ मध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या माही विजचे मूळ गाव दिल्ली आहे.
4/10
२००९ च्या 'लागी तुझसे लगन' या मालिकेत नकुशाची भूमिका साकारल्यानंतर घराघरात लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री वयाच्या १७ व्या वर्षी ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी मुंबईत राहायला आलेली.
5/10
ती २००५ पासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे, ती पहिल्यांदा रेणुका चौहान आणि रक्षा कपूर यांच्यासोबत 'तू तू है वही' या गाण्यात दिसली.
6/10
२००६ मध्ये, माही विजला 'अकेला' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत पहिली भूमिका मिळाली.
7/10
खरंतर तिला 'लागी तुझसे लगन' मधील नकुशाच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली, ती मालिका भारतातील टॉप रेटेड शोपैकी एक होती.
8/10
पुढे माहीने टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता जय भानुशालीसोबत लग्न केले. त्यांना आता एक मुलगीही असून सोबतच ते आपल्या केअरटेकरच्या मुलांचाही सांभाळ करतात.
9/10
माहीने नुकतेच नवे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने रॉयल ब्लु रंगाचा लेहेंगा घातला आहे.
10/10
माहीने तिच्या मुलीसोबतही फोटोशुट केलं आहे.
Published at : 04 Apr 2025 02:22 PM (IST)