अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकणार; गोव्यात होणार विवाहसोहळा!
आजकाल टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत लग्नसराई सुरु झाली आहे. अलीकडेच कतरिना कैफ(Katrina kaif)-विकी कौशल (Vicky Kaushal) विवाह बंधनात अडकले. त्यानंतर, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)-विकी जैन (Vicky Jain) आणि मौनी रॉय (Mouni Roy)-सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा विवाह पार पडला. आता आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा यामध्ये समावेश होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्नासाठी आजचा दिवस खूप खास आहे.
आज करिश्माने तिच्या मंगेतर वरुण बंगेराबरोबर सहजीवनाचा प्रवास करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, करिश्माचा आज हळदीचा सोहळा होणार आहे. तिच्या इंन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये तिने फुलांच्या सजावटीची झलक दाखवली आहे.
त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं आहे की, कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन या जोडप्याने जवळचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये हळदीचा विधी ठेवला आहे. उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला मेहंदी सोहळा पार पडणार आहे.
5 फेब्रुवारीला लग्नाचा शुभ मुहूर्त ठरविण्यात आला आहे. (all photo: karishmatanna/ig)