Kareena Kapoor Khan : करीना कपूर खानचा ग्लॅम देसी अवतार; सिल्वर साडीमध्ये वेधलं लक्ष!
भारतीय सिनेमात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी एक ताकदवान अभिनेत्री म्हणून करीनाचा (Kareena Kapoor Khan) उल्लेख कायम केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरीना कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत २४ वर्षे पूर्ण केली आहेत.
तिने 2000 साली 'रेफ्युजी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, जो अभिषेक बच्चनचाही डेब्यू चित्रपट होता.
करिनाने इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत किमान 74 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अजूनही करत आहे.
करीना कपूर खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सिल्व्हर कलरची साडी घातली आहे.
करिनाने स्लीक बन आणि सॉफ्ट ग्लॅम मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
यामुळे अभिनेत्रीचे चाहते आणखी प्रभावित झाले आहेत. कपाळावर छोट्या बिंदीने अभिनेत्रीचा देसी लुक आणखी खुलवला आहे.
करीना कपूर खान सिल्वर चमकदार साडीमध्ये सुंदर दिसत आहे.
करीना सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या वर्षी ती ‘क्रू’, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ आणि ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसली .