घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त, घर मिळावं म्हणून वणवण, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री नव्याने कशी उभी राहिली?
Kalki Koechlin On Divorce: बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री कल्की कोचलीन ही नेहमीच चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या अॅक्टिंगच्या करिअरची सुरुवात 2009 साली देव डी या चित्रपटापासून झाली. त्यानंतर तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'एक थी डायन' अशा अनेक चित्रपटांत काम केलं.
दरम्यान, 2011 साली तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर पुढच्याच दोन वर्षांत अनुराग कश्यप आणि कल्की यांचा घटस्फोट झाला.
2013 साली कल्की कोचलीन आणि अनुराग कश्यप यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर 2015 साली त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला.
या घटस्फोटानंतर मात्र कल्कीच्या आयुष्यात एका प्रकारे वादळच आलं. तिला पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली होती.
अनुराग कश्यपसोबत लग्न झाल्यानंतर कल्कीला राहण्यासाठी घर हवं होतं. मात्र तिला कोणीही भाड्याने घर देत नव्हतं. कल्कीने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
तुम्ही एकल महिला असाल आणि तुम्हाला मुंबईत घर हवे असेल तर तुम्हाला फार अडचण येते. तुम्हाला सहसा घर भाड्याने मिळत नाही. त्या काळात प्रत्येकाला माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. पण मला घर देण्यास कोणीही तयार नव्हतं, असं ती या पॉडकास्टमध्ये म्हणाली.
दरम्यान, आता कल्की कोचलीन तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे. तिने Guy Hershberg याच्याशी 2024 साली लग्न केलं. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. तिला सप्फू नावाची मुलगी आहे.
कल्की कोचलीन
कल्की कोचलीन